शहर बस सेवेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती

Foto

औरंगाबाद- महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी योजने अतंर्गत सिटी बस सेवेचे आज उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमावर एमआयएमने बहीष्कार टाकला होता तर भाजपने निमंत्रण नसल्याचे सांगितले होते. मात्र कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची उपस्तिथी आहे. भाजपचे आमदार अतुल सावे, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, उपमहापौर विजय औताडे, माजी आमदार किशनचंद तनवानी, भाजपचे गटनेटे प्रमोद राठोड, मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, नगरसेवक दिलीप थोरात उपस्थित आहेत.

 

दरम्यान, एमआयएमचे आ. इम्तियाज जलील, विरोधी पक्षनेते जमीर कादरी हे नगरसेवक कार्यकर्त्यासह कार्यक्रमास आल्याने उपस्थित सर्वांच्याच चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मनपाच्या प्रशासनाने कार्यक्रमातून अंग काढून घेतले होते. मात्र, मनपाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. यामुळे नेमक्या रात्रीतून काय घडामोडी घडल्या याचीच चर्चा कार्यक्रमस्थळी सुरु होती. कार्यक्रमात या सर्वांना पाहून महापौरांसह सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला असेच म्हणावे लागेल. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे, सेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, स्थायी समिती सभापती रेणूकदास वैद्य, सभागृह नेते विकास जैन यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker